Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरनामदार उदयजी सामंत यांचे प्रकाश चित्ते यांच्या निवास्थानी जल्लोषात स्वागत

नामदार उदयजी सामंत यांचे प्रकाश चित्ते यांच्या निवास्थानी जल्लोषात स्वागत

श्रीरामपूर | छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत श्रीरामपुरात दाखल झाले होते. या कार्यक्रमा नंतर श्री सामंत यांनी अचानक शिवसेना नेते प्रकाश चित्ते यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

नामदार उदयजी सामंत यांच्या आगमनावेळी प्रकाशजी चित्ते यांच्या पत्नी सौ. दिपाली चित्ते यांच्यासह अनेक सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचे स्वागत केले. फटाक्यांच्या आकाशबाजीत, ढोल ताशांच्या निनादात व शिवसेना विजयाच्या जल्लोषी घोषणांमध्ये मंत्री सामंत यांचे आगमन स्वागत करण्यात आले. परिसरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी शिवसेनेचे संपर्कनेते जनार्दनजी गालपगार, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, आचार्य महेशजी व्यास , युवा नेते निरजी मुरकुटे, शशिकांत कडूसकर, माजी नगरसेवक किरणजी लुनिया, संजय पांडे, राजेंद्रजी कांबळे, अशोक कारखान्याचे माजी संचालक बबनराव मुठे, मार्केट कमीटीचे संचालक मनोजजी हिवराळे, सुदर्शन नागरी चेअरमन देविदासजी चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रदीपजी वाघ यांसह शुभम वाघ, सुरेश असणे, गणेश भिसे, संजय यादव, सोमनाथ कदम, सोमनाथ पतंगे, सिद्धार्थ साळवे, बाळासाहेब गाडेकर, रमेश सातपुते, रमेश शिनगारे, दर्शन चव्हाण, विशाल जाधव, जनार्दन सोनवणे यांसह शहर व तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर सामंत यांची ही अनपेक्षीत भेट राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरत असून शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रकाश चित्ते यांच्या निवासस्थानी झालेल्या या स्वागत सोहळ्यात वातावरणात “शिवसेना जिंदाबाद” च्या घोषणांचा जल्लोष घुमला.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!