Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरधक्कादायक प्रकार! सरकारी शाळेत मुलांकडून मजुरी, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत सुरू होता...

धक्कादायक प्रकार! सरकारी शाळेत मुलांकडून मजुरी, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत सुरू होता प्रकार

श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक २ मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. शासनाकडून आलेल्या शालेय पुस्तकांचा ट्रक खाली करण्यासाठी चक्क लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शाळेचे मुख्यध्यापक आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास श्रीरामपूर नगरपरिषद शाळा क्रमांक २ मध्ये ही धक्कादायक घटना घडली. एकीकडे शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे याच विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी मजुरी करायला लावल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुख्याध्यापक सचिन शिंदे आणि पंचायत समिती कर्मचारी अहमद शाईन यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू होते. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून ‘तुम्हाला काय घेणं आहे?’ असे म्हणून पत्रकारांना दम दिला. यामुळे या प्रकरणात आणखी गंभीरतेचा वास येत आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून, बालमजुरीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाऐवजी मजुरीच्या कामात जुंपणाऱ्या या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणातील दोषींवर चौकशीचे आदेश दिल्याची माहिती श्रीरामपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के यांनी दिली आहे. काय आहे हा प्रकार बघण्यासाठी येथे 👉 क्लिक करा

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!