Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरके. पी. सुपर मार्केट फोडणारे आरोपी अटकेत, 1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

के. पी. सुपर मार्केट फोडणारे आरोपी अटकेत, 1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर शहर पोलीसांची मोठी कामगिरी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील संगमनेर रोडवरील के. पी. सुपर मार्केट फोडून झालेल्या चोरीचा अवघ्या दोन दिवसांत उलगडा करताना श्रीरामपूर शहर पोलीसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 1,20,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी रात्री साडेनऊ वाजल्यापासून ते 23 ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास, फिर्यादी सुमित शम्मीकुमार गुलाटी (वय 33, रा. दशमेशनगर, पंजाबी कॉलनी, श्रीरामपूर) यांच्या सुपर मार्केटचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दुकानातील 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. 771/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला. अखेर माहिती मिळाल्यानुसार सराईत गुन्हेगार अभय ऊर्फ किशोर समज केदारे (वय 19, रा. वारुळाचा मारुती, नालेगाव, जि. अहिल्यानगर) व समीर जाकीर सय्यद (वय 20, रा. बुरुगाड रोड, जाहागिरदार चाळ, अहिल्यानगर, सध्या रा. शाहूनगर, केडगाव) यांना अटक करण्यात आली. सखोल चौकशीत आरोपींनी आपल्या साथीदारांसह (अकबर, पूर्ण नाव-पत्ता अज्ञात, फरार व अन्सार शेख, रा. नालेगाव, जि. अहिल्यानगर, फरार) मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 45,630/- रोकड (त्यात विविध दराचे चलन व नाणी समाविष्ट) 75,000/- किमतीची काळ्या रंगाची, बिगर नंबरची टीव्हीएस रायडर मोटारसायकल (चेसिस नंबर MD62AF92R1L28879) जी चोरी करताना वापरण्यात आली. अशाप्रकारे एकूण ₹1,20,630/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पीआय नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकातील पु.उ.नि. समाधान सोळंके, पो.हे.कॉ. जयवंत तोडमल, पो.ना. भागवत शिंदे, पो.कॉ. अमोल पडोळे, सागर बनसोडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सचिन काकडे, सचिन दुकळे, रामेश्वर तारडे, पांडुरंग चौधरी, गणेश तुपे व महिला पो.कॉ. मीरा सरग यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, अटक आरोपींवर पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. शहरातील मोठा व्यावसायिक दरोडा उघडकीस आल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. चला तर बघूया याविषयी स्पेशल रिपोर्ट

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!