Homeमहाराष्ट्रश्रीरामपुर४५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा श्रीरामपूरात दिमाखात...

४५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा श्रीरामपूरात दिमाखात स्थापित

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – गेली चार दशके प्रतीक्षेत असलेल्या श्रीरामपूर शहरवासीयांच्या उत्कट भावनांना अखेर न्याय मिळाला असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा मोठ्या दिमाखात आणि जयघोषात शहरात दाखल झाला. नेहरू मार्केट येथील नियोजित स्मारकस्थळी ढोल-ताशांच्या गजरात पुतळ्याचे आगमन झाले. शहरातील शेकडो शिवप्रेमींनी उपस्थित राहून महाराजांच्या या आगमनाचे जल्लोषात स्वागत केले. पुतळा आगमनाच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भगव्या पताका, घोषणांनी आणि देशभक्तिपर वातावरणाने भरून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय! च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शहरातील नागरिक, महिलावर्ग, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुतळा आगमन सोहळ्यात सहभाग घेतला.

मात्र, या आनंदमयी क्षणातही राजकारणाची किनार दिसून आली. पुतळा स्थापनेनंतर पूजनाच्या कार्यक्रमावरून भाजपा गटांत वाद निर्माण झाला. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे आणि सद्य भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर या दोन गटांनी स्वतंत्रपणे पूजन करून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून, “छत्रपतींच्या पुतळ्यात तरी राजकारण आणू नका,” अशी भावना शहरातील नागरिकांनी व्यक्त केली. या पुतळा स्थापनेमुळे शहराला एक नवा गौरव प्राप्त झाला असून, शिवप्रेम, इतिहास आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून हे स्मारक भविष्यात प्रेरणास्थान ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, अशा ऐतिहासिक क्षणात एकतेचे दर्शन घडण्याऐवजी राजकीय गटांमध्ये वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे निर्माण झालेली दुःखद परिस्थिती खेदजनक असल्याची प्रतिक्रिया सामाजिक स्तरावरून व्यक्त होत आहे.

यावेळी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, बांधकाम विभागाचे अधिकारी सूर्यकांत गवळी, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, गणेश जाधव, माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, नगरसेवक शामलिंग शिंदे, इंजिनीयर संदीप चव्हाण, कामगार नेते नागेश भाई सावंत, संजय गांगड, शंकरराव मुठे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे गिरीधर आसने, नाना शिंदे, महेंद्र पटारे, माजी नगरसेवक आशिष धनवटे, चरण चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, शंतनू फोपसे, सतीश सौदागर, विशाल अंभोरे, सागर भागवत, जीवन सुरुडे, पुष्पलता हरदास, पूजा कांबळे, बंडू कुमार शिंदे, बाळासाहेब हरदास, अनिल भनगडे, सुदर्शन शितोळे आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.5 ° C
26.5 °
26.5 °
87 %
1.6kmh
100 %
Fri
27 °
Sat
31 °
Sun
29 °
Mon
30 °
Tue
31 °

Most Popular

error: Content is protected !!