श्रीरामपूर : तालुक्यातील महत्वाची असणाऱ्या भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त बिनविरोध सरपंच आणि सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.दिपालीताई फरगडे यांना लोकनेते खा.भाऊसाहेब वाकचौरे मित्र मंडळ व साई अर्पण फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खा.भाऊसाहेब वाकचौरे , प्रभावती घोगरे , रोहित वाकचौरे यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकनेते खा.भाऊसाहेब वाकचौरे मित्र मंडळ व साई अर्पण फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याकडून “ आदर्श सरपंच ” यासाठी प्रस्ताव मागविण्यात आलेले होते आलेल्या प्रस्तावांपैकी भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त बिनविरोध सरपंच आणि सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.दिपालीताई फरगडे यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांना “आदर्श सरपंच ” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त बिनविरोध सरपंच आणि सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेल्या कार्य हे अत्यंत चांगले असून आदर्श असे आहे त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी अशोक मामा थोरे, घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या मा.उपसरपंच जिजाबाई सातपुते, भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच चंद्रभागा काळे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लबडे, कांता शेळके , सीमा शिंदे, विमल थोरात , सुभाष शेळके, छाया थोरात , प्रदीप नरोडे, रुत्वी नरोडे ,सुनिल शिंदे, विजय शिंदे, आण्णा पाटील फरगडे,श्रीराम फरगडे , मच्छिंद्र भवार आयोजक सुरज शिंदे , प्रतिक गीरी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते