Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरसुंदर नाम सप्ताहाची या समाजाला खरी गरज - शिवव्याख्याते निलेश महाराज कोरडे

सुंदर नाम सप्ताहाची या समाजाला खरी गरज – शिवव्याख्याते निलेश महाराज कोरडे

माळवाडगाव/प्रतिनिधी:– संसार प्रपंचापेक्षा विठोबाचे व परमार्थाचे नामस्मरण चिंतन महत्वाचे आहे सुख मिळविण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो खरे बोलाल तर परमार्थाची कृपा होईल सुंदर नाम सप्ताहाची या समाजाला आज खरी गरज असल्याचा उपदेश शिवव्याख्याते प्राध्यापक निलेश महाराज कोरडे यांनी माळवाडगाव येथे धर्मध्वज तृतीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या पंचदिवशीय कीर्तन महोत्सवात भाविकांना केला.

अध्यात्म म्हणजे साधुसंत ग्रंथांच्या सानिध्यात राहणे होय धर्म ध्वजाच्या रूपाने या गावात अध्यात्माची पंढरी उतरले असून ज्येष्ठ मंडळींना यश आले आहे तरुणाई वाम मार्गाला जात नाही जिल्ह्यात पहिलाच धर्म ध्वज या गावात दिसत आहे सप्ताहाची अखंड परंपरा या ठिकाणी आहे मानवी जीवाला देह मिळाला पण तो कळाला नाही जगावे कसे हे मात्र समजले आहे माणसाने आपले कर्म आदर्श करावे त्यासाठी संस्कार महत्त्वाचे आहे त्यातून सुंदर सप्ताहाची समाजाला आज गरज आहे आजची तरुण पिढी वाद सोडण्यास तयार आहे मात्र ज्येष्ठ तयार नाही भाऊ म्हणजे कर्तुत्व आहे आपलं घर गोकुळ करा स्मशान करू नका शेतकऱ्यांच्या मुलांना आज मुली मिळत नाही परिस्थिती वाईट आहे शेतकरी जावई चालत नाही ही शोकांतिका आहे सुखासाठी बांध करू नका दोन भावांनी एकत्र या कष्ट करून माणसे मोठे होतात कष्टाने कुटुंब घडवली जातात रावणाची सोन्याची लंका मातीमोल झाली बिबीशन लंकेचा राजा झाला असा इतिहास आहे असे निरूपण शिवव्याख्याते ह भ प निलेश महाराज कोरडे यांनी यावेळी केले नानासाहेब आसने यांनी संत पूजन केले तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक मित्र मंडळ यांनी भाविकांना भोजन दिले तर बाळासाहेब महाराज पवार काशिनाथ महाराज टेकाळे कृष्णा महाराज हापसे यांची कीर्तनात संगीताची साथ मिळाली.

या समारंभास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने, भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक आकाश बेग, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष डॉ. शंकरराव मुठे, सुदाम आप्पा आसने, रावसाहेब नाना काळे सतीश आसने दिलीपराव हुरुळे किसनराव आसने सुधीर आसने प्रमोद आसने भास्कर आसने बाबुराव दळे सोमनाथ मोरे तुळशीराम कापसे अरुण आसने भिकचंद मुठे अतिश आसने अमोल मोरे दत्तात्रय मोरे दादासाहेब अनुसे, प्रदीप आसने, सतिष आसने, विठ्ठल आसने, योगेश लटमाळे, श्रीराम हुरूळे, परमेश्वर गाडे, भाऊसाहेब आसने, भानुदास चिडे, सुभाष आसने, गोरख आसने, अनिल आसने, विजय आसने, तेजस आसने, सार्थक सोमकुवर पत्रकार विठ्ठलराव आसने सह आदी भाविक मान्यवार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, उपस्थितांचे पत्रकार संदिप आसने यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
Jharkhand
moderate rain
28.3 ° C
28.3 °
28.3 °
79 %
3kmh
100 %
Mon
30 °
Tue
26 °
Wed
27 °
Thu
28 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!