श्रीरामपूर (प्रतिनिधी) : मुल्ला कटर बलात्कार प्रकरणातील साक्षीदार महिलेस धमकी दिल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा पूर्णतः खोटा असून, तो एका नियोजित राजकीय षड्यंत्राचा भाग आहे, असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे तपासाची मागणी करत या प्रकरणातील सत्य बाहेर आणावे अशी मागणी केली आहे
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा, सिद्धार्थ मुरकुटे संतोष कांबळे , राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांची भेट घेतली. यावेळी सुनील मुथा म्हणाले, “हे संपूर्ण प्रकरण अत्यंत नियोजनबद्ध असून प्रकाश चित्ते यांची राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांनी नियोजनबद्ध कट रचला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून आम्ही याचा तीव्र निषेध करतो. सामाजिक कार्यकर्त्यांना आणि राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याचा घृणास्पद प्रकार श्रीरामपूर शहरात सुरू झाला आहे. यापूर्वीही अशा प्रकारचे प्रयत्न सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी राजकीय मतभेद विसरून आणि पोलिसांनीही योग्य तपास करून हाणून पाडले आहेत. याही प्रकरणात पोलीस राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणातील सत्यता बाहेर आणतील आणि श्रीरामपूर सुरू होऊ पाहत असलेली अनिष्ट प्रथा मोडीत काढतील अशी आशा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने व्यक्त केली. या प्रकरणात चुकीची कारवाई झाली तर मोठे जन आंदोलन उभारले जाईल आणि प्रसंगी श्रीरामपूर बंदही केले जाईल असा इशारा शिष्टमंडळाने दिला
या शिष्टमंडळात सिद्धार्थ मुरकुटे, शशिकांत कडूस्कर, संजय पांडे, राजेभाऊ कांबळे, किरण लुनिया , बबनराव मुठे, गौतम उपाध्ये, राजेंद्र सोनावणे, संतोष कांबळे, नगरसेवक दिपक चव्हाण, गणेश भिसे, बाळासाहेब गाडेकर, संजय यादव, राजेंद्र पाटणी, सुरेश सोनवणे, मच्छिंद्र बांद्रे, सुनील दातीर, गणेश मुंडलिक, काका शेलार, देविदास वाघ, देविदास सोनवणे, सोमनाथ पतंगे, अक्षय नागरे, सिद्धार्थ साळवे, विशाल त्रिवेदी, धीरज सोनवणे, गोरख गांगुर्डे, सुरेश आसने, देविदास कहाणे,रमेश शिनगारे,सरपंच संदीप वाघमारे, विशाल दुर्गे, यांसारख्या असंख्य सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.