Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरसणांपूर्वी श्रीरामपूर पोलिसांची 'अ‍ॅक्शन'! | शांततेसाठी शहरात पोलिसांचं 'शक्ती प्रदर्शन'.

सणांपूर्वी श्रीरामपूर पोलिसांची ‘अ‍ॅक्शन’! | शांततेसाठी शहरात पोलिसांचं ‘शक्ती प्रदर्शन’.

श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरात येत्या काळात येणाऱ्या ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्थी या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. यानिमित्ताने, शहरातील मुख्य रस्त्यांवर पोलिसांचे पथ संचलन आयोजित करण्यात आले होते. शहरातील नागरिकांना कोणत्याही अफवांना बळी न पडता, शांततेत सण साजरे करता यावेत, यासाठी निर्भयतेचा संदेश देणे हा या पथ संचलनाचा मुख्य उद्देश होता. हे पथ संचलन उपविभागीय पोलीस अधीक्षक जयदत्त भंवर आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यात ९ पोलीस अधिकारी, ११० पोलीस अंमलदार आणि दंगल नियंत्रण पथकाचे जवान सहभागी झाले होते. शहरातील छत्रपती रोड आणि ईद-ए-मिलाद मिरवणूक मार्गावरून हे पथ संचलन काढण्यात आले. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सण उत्सवांच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी हे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यामुळे, सणांचा उत्साह टिकून राहील आणि शांततापूर्ण वातावरणात सर्व सण साजरे होतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!