Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर शहर पोलिसांची बेकायदेशीर सावकारीविरोधात धडक कारवा, मनीष मुथा व सुनील...

श्रीरामपूर शहर पोलिसांची बेकायदेशीर सावकारीविरोधात धडक कारवा, मनीष मुथा व सुनील मुथा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील बेकायदेशीर सावकारीच्या वाढत्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांनी सोमवारी महत्त्वाची कारवाई केली. जुन्या वाहनांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात उभी असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांची तपासणी करताना पोलिसांना एक गंभीर तक्रार समोर आली.तक्रारदार रोहित संतोष भालेकर (रा. बेलापूर रोड, बजरंगनगर, श्रीरामपूर) यांनी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देत मनीष मुथा व सुनील मुथा (दोघेही रा. बेलापूर बु.) यांच्यावर बेकायदेशीर सावकारी केल्याचा आरोप केला होता. भालेकर यांनी कर्जाकरिता आपली मोटरसायकल तारण ठेवली असता दोन्ही आरोपींनी नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त व्याज आणि रकमेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला.

या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, श्रीरामपूर यांच्याकडे शासकीय नोंदींची चौकशी केली. त्यानुसार आरोपी मनीष व सुनील मुथा यांच्याकडे सावकारी व्यवसायाचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत सहाय्यक निबंधकांनी पोलिसांना लेखी स्वरूपात अहवालही दिला आहे. आज (दि. 18 नोव्हेंबर 2025) तक्रारदार भालेकर पोलीस ठाण्यात हजर झाले असता त्यांच्या जबाबावरून शहर पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 1023/2025 नोंदवला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 308(2) सह महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक अधिनियम कलम 39 व 44 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दुचाकी/चारचाकी वाहने किंवा अन्य मालमत्ता तारण ठेवून बेकायदेशीरपणे जादा व्याजदराने कर्ज देणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारचे प्रकार आढळल्यास तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!