Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर शहरात गुप्त चर्चा; एका युवा नेत्यावर नाजूक प्रकरणातून मारहाणीचा प्रकार

श्रीरामपूर शहरात गुप्त चर्चा; एका युवा नेत्यावर नाजूक प्रकरणातून मारहाणीचा प्रकार

श्रीरामपूर : शहरातील राजकीय वर्तुळात सध्या दबक्या आवाजात एकच चर्चा आहे – एका प्रसिद्ध युवा नेत्यावर झालेल्या मारहाणी बाबत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना एका अत्यंत नाजूक प्रकरणातून उफाळून आली आहे. तालुक्यातील एका 39 वर्षीय महिलेला कथितरित्या अश्लील संदेश पाठविल्याच्या आरोपावरून संबंधित युवा नेत्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, ज्या महिलेवरून हा वाद निर्माण झाला, तिचा पती देखील एका प्रतिष्ठित सामाजिक संघटनेचा पदाधिकारी असल्याचे समजते. त्यामुळे प्रकरणाला अधिकच संवेदनशील व राजकीय वळण मिळाले आहे. या घटनेनंतर शहरात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मारहाणीचा प्रसंग घडल्यानंतर, संबंधित युवा नेत्याचे वडील, ज्यांचा स्थानिक पातळीवर प्रभाव आहे, त्यांनी तातडीने आर्थिक सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही वृत्त आहे. त्यांनी या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात होऊ नये यासाठी आणि गोष्ट जास्त गाजू नये म्हणून आर्थिक तोडगा काढण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

युवा नेत्याने स्वतःही आपले राजकीय करिअर धोक्यात येऊ नये म्हणून भावनिक साद घालत, पीडित बाजूकडील लोकांना समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. “माझे राजकीय भविष्य उध्वस्त होईल, कृपया प्रकरण वाढवू नका,” अशी विनवणी करत प्रकरण दाबण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये, स्थानिक राजकीय मंडळींमध्ये आणि सोशल मिडियावर एकच चर्चा आहे – “हा युवा नेता कोण?” मात्र, संबंधित घटनेबाबत अधिकृतरीत्या कोणीही खुलेपणाने बोलायला तयार नाही. सर्व स्तरांवरून प्रकरण झाकण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, शहरातील कुजबुज थांबण्याचे नाव घेत नाही. शहरातील प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेले हे प्रकरण लवकरच अधिकृत स्वरूपात समोर येते का, आणि या युवा नेत्याचे पुढचे राजकीय भविष्य कसे घडते, याकडे संपूर्ण श्रीरामपूरचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
87 %
1.5kmh
100 %
Tue
28 °
Wed
31 °
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!