Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये नशामुक्तीसाठी समुपदेशन कार्यक्रम संपन्न; तरुणांनी घेतली नशा न करण्याची...

श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये नशामुक्तीसाठी समुपदेशन कार्यक्रम संपन्न; तरुणांनी घेतली नशा न करण्याची प्रतिज्ञा

श्रीरामपूर – “नशा ही केवळ वैयक्तिक नाही, तर सामाजिक समस्या बनली असून, तिचा सामना करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे,” या भावनेतून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नशामुक्तीसाठी विशेष समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातील तरुण पिढी व्यसनाच्या दलदलीत अडकू नये, यासाठी प्रबोधन व मानसिक आधार देणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, तसेच श्रीरामपूर विभागाचे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांनी केले. यावेळी व्यसनमुक्तीमध्ये मानसिक समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तरुणांमध्ये विश्वास निर्माण करून, त्यांना समजूतदारपणा व सकारात्मक दृष्टीकोन दिल्यास व्यसनमुक्ती अधिक प्रभावी ठरते, असेही सांगण्यात आले.

कार्यक्रमासाठी श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे शंभर ते दीडशे व्यसनाधीन तरुण, त्यांचे पालक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, समाधान सोळंके व रोशन निकम यांनी उपस्थित तरुणांना तंबाखू, गुटखा, दारू, गांजा व अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम स्पष्टपणे सांगितले. या मार्गदर्शन सत्रानंतर उपस्थित तरुणांकडून कोणत्याही प्रकारची नशा न करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक तरुणांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येण्याची आशा व्यक्त करण्यात आली. पोलीस प्रशासनाने घेतलेला हा पुढाकार समाजात नशाविरोधी जनजागृतीसाठी एक प्रभावी पाऊल ठरले असून, भविष्यात अशा कार्यक्रमांची संख्या वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!