Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर पोलिसांची मोठी कामगिरी : 4 किलो गांजासह दोघांना अटक

श्रीरामपूर पोलिसांची मोठी कामगिरी : 4 किलो गांजासह दोघांना अटक

श्रीरामपूर – श्रीरामपूर शहर पोलिसांनी गांजाच्या अवैध विक्रीवर मोठी कारवाई करत 4.043 किलो गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 1,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई 7 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शहरातील भळगट चौक, वॉर्ड क्र. 07 येथे करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. वर्णनानुसार आलेली ग्रे रंगाची मारुती सुझुकी सिलेरिओ (MH-15 GL-5706) कार थांबवून तपासणी केली असता, डिक्कीमध्ये विक्रीस बंदी असलेला 4.043 किलो वजनाचा हिरवट रंगाचा, सुकलेल्या पानांचा गांजा आढळून आला. वाहनचालकाने आपले नाव स्वप्नील संजय क्षत्रीय (वय 37, रा. चैतन्यनगर, संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे सांगितले.

चौकशीत त्याने सदर गांजा हे आपला साथीदार सत्येंद्र शिवाजी रणमाळे (वय 52, रा. बारी शिंगवे, ता. इगतपुरी, जि. नाशिक) याच्यासोबत मिळून श्रीरामपूर येथे विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी रणमाळे याला श्रीरामपूर बसस्थानकाजवळून अटक केली. दोन्ही आरोपींकडे गांजा बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी 59,000 रुपयांचा गांजा आणि 50,000 रुपयांची मारुती सुझुकी सिलेरीओ कार असा एकूण 1,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 490/2025 अन्वये एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब) ii(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना 11 मे 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, समाधान सोळंके, दादाभाई मगरे, दीपक मेढे, पोना. शरद अहिरे, पोकॉ. संपत बडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अमोल पडोळे, अजित पटारे, अकबर पठाण, आजिनाथ आंधळे, राहुल पौळ, सचिन दुकळे, रविंद्र अंभग, अमोल गायकवाड, सागर बनसोडे, सफौ. चालक राजेश सूर्यवंशी, पोकॉ. बाळासाहेब गिरी आणि मपोकॉ. मिरा सरग यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील अमलीपदार्थांच्या विक्रीला आळा बसण्यास मदत होणार आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
broken clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
87 %
2.2kmh
68 %
Wed
26 °
Thu
30 °
Fri
30 °
Sat
27 °
Sun
31 °

Most Popular

error: Content is protected !!