Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर तालुक्यात प्रथमच मोफत कॅन्सर तपासणी व्हॅनचे आयोजन

श्रीरामपूर तालुक्यात प्रथमच मोफत कॅन्सर तपासणी व्हॅनचे आयोजन

सौ. प्रणिती चव्हाण यांच्या पुढाकाराने उपजिल्हा रुग्णालयात सेवा उपलब्ध

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे लवकर निदान होण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांसाठी एक सकारात्मक उपक्रम राबवण्यात आला. ३० जून २०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय, शिरसगाव येथे मोफत कॅन्सर तपासणी व्हॅन सेवा उपलब्ध करून देण्यात आली. ही सेवा तालुक्यात प्रथमच सुरू झाली असून, सौ. प्रणिती दीपक चव्हाण (सदस्य – उपजिल्हा रुग्णालय समिती व माजी नगरसेविका) यांच्या विशेष पुढाकारातून हा उपक्रम साकार झाला. या तपासणी मोहिमेस महिलांचा आणि पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्तन, गर्भाशय मुख, तोंड, गळा, फुफ्फुसे, त्वचा व पचनसंस्था संबंधित कॅन्सर तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. तपासणीसाठी कोणतेही शुल्क आकारले गेले नाही.

कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. प्रणिती चव्हाण व डॉ. सुनील गोराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक परदेशी, डॉ. योगेश बंड, डॉ. काकड, डॉ. आसिफ शेख, डॉ. रविना सांगळे, परिचारिका सौ. जमधडे, सौ. आरु शेळके तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तपासणीदरम्यान आरोग्य गोपनीयतेचे पूर्ण पालन करण्यात आले. काही रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.

सौ. चव्हाण यांनी सांगितले की, “कॅन्सर वेळेत निदान झाल्यास बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी वेळ न दवडता अशा तपासण्यांचा लाभ घ्यावा. विशेषतः महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता सजग राहावे.” या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी सहज सुविधा उपलब्ध झाली असून, भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य यंत्रणा व समाजसेवकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. सौ. प्रणिती चव्हाण यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून, भविष्यातही विविध आरोग्य सेवा श्रीरामपूर तालुक्यात पोहोचतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.5 ° C
26.5 °
26.5 °
87 %
1.6kmh
100 %
Fri
27 °
Sat
31 °
Sun
29 °
Mon
30 °
Tue
31 °

Most Popular

error: Content is protected !!