Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

श्रीरामपूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

महिला सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत उद्या :– तहसीलदार वाघ

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण गटासाठी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत आज श्रीरामपूर तहसील कार्यालयात काढण्यात आली. तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोडतीवेळी ग्रामपंचायत महसूल सहायक उत्तम रासकर उपस्थित होते.

या सोडतीत अनुसूचित जाती (एस.सी.) गटासाठी गोवर्धनपूर, मातुलठाण, मांडवे, कुरणपूर, दत्तनगर, पढेगाव, निपाणी वडगाव, वडाळा महादेव, खानापूर, उंबरगाव, निमगाव खैरी, मालुंजा बु. आणि लाडगाव या ग्रामपंचायतींची निवड झाली आहे.

अनुसूचित जमाती (एस.टी.) गटासाठी खोकर, ब्राम्हणगाव वेताळ, टाकळीभान, रामपूर, भैरवनाथनगर, माळेवाडी, महांकाळवडगाव व वळदगाव ही गावे आरक्षित करण्यात आली आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) गटासाठी भामठाण (निवडणूक न झाल्याने आरक्षण कायम), एकलहरे, गुजरवाडी, हरेगाव (निवडणूक न झाल्याने कायम), जाफ्राबाद, खंडाळा, खिर्डी, शिरसगाव, उक्कलगाव, उंदिरगाव, वांगी बु., वांगी खुर्द, कान्हेगाव आणि कारेगाव ही गावे निश्चित करण्यात आली आहेत.तर,

सर्वसाधारण गटासाठी बेलापूर खुर्द, भेर्डापूर, भोकर, दिघी, फत्याबाद, गळनिंब, घुमनदेव, गोंडेगाव, कडीत बु., कमालपूर, माळवडगाव, मातापुर, मुठेवाडगाव, नाऊर, बेलापूर बु., सरला व नायगाव या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत.

या सोडतीच्या प्रक्रियेमध्ये पूर्णतः पारदर्शकता राखण्यात आली असून सर्व संबंधित ग्रामस्थांना अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आगामी काळात महिला सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वाघ यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
82 %
1.1kmh
100 %
Wed
32 °
Thu
33 °
Fri
27 °
Sat
30 °
Sun
31 °

Most Popular

error: Content is protected !!