Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

श्रीरामपूरमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

धार्मिकते सोबत सामाजिक ऐक्याचे दर्शन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरात नगरपरिषद व बजरंग व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान जन्मोत्सवाचा भव्य व भक्तिपूर्ण सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या उत्सवाचे प्रभावी आयोजन करण्यात आले. उत्सवाची सुरुवात पहाटे ५ वाजता नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते अभिषेकाने झाली. यानंतर दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी व नगरपालिकेचे प्रशासक किरण सावंत पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, मुख्याधिकारी घोलप व दैनिक जय बाबा चे संपादक मनोज आगे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या महाआरतीने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.

महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो नागरिकांनी त्यात सहभाग घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यास श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष राजश्रीताई ससाणे, उपनगराध्यक्ष संजय फंड, कैलास दुब्बे, आण्णासाहेब डावखर, राजेश अलग, रवी पाटील, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, संजय छल्लारे, तसेच श्रीराम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग आदी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनोज आगे, पुरुषोत्तम झंवर, सूर्यकांत सगम, राजेंद्र बोरकर, तसेच नगरपालिकेचे बांधकाम विभाग अधिकारी सूर्यकांत गवळी, ग्रंथपाल स्वाती पुरे, प्रकाश बोकन, सचिन दोडकर, किशोर वाडिले, आदींचे विशेष योगदान राहिले. बजरंग व्यायाम शाळेतील आजी-माजी सभासद, तसेच नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्सवाचे यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमात संतोष तारडे, स्वप्नील माळवे, निर्मळ गुरु, रोहित हिवराळे, यश अहिरे, सौ. मंगल रेड्डी, कांचन चावरे, संगिता रासकर यांचाही मोलाचा सहभाग होता. एकंदरीत, श्रीरामपूर शहराने श्रद्धा, समर्पण, आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम असलेला हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात व सलोख्याने साजरा केला, याबद्दल नागरिकांतून समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे. शहरातील धार्मिक वातावरणात एकतेची भावना अधिक बळावली असून, हा उत्सव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
moderate rain
24.9 ° C
24.9 °
24.9 °
94 %
1.1kmh
100 %
Tue
28 °
Wed
31 °
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!