Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरमध्ये माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला; जातीवाचक शिवीगाळ करत सोनसाखळीची...

श्रीरामपूरमध्ये माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला; जातीवाचक शिवीगाळ करत सोनसाखळीची चोरी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर राहिलेले माजी नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण (वय ४४, रा. बाजारतळ, श्रीरामपूर) यांच्यावर बुधवारी रात्री गिरमे चौक परिसरात ५ ते ६ अनोळखी इसमांनी प्राणघातक हल्ला केला. जातिवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या धक्कादायक घटनेमुळे शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिपक बाळासाहेब चव्हाण हे बुधवारी (दि. १ ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास आपले सहकारी रवि रमेश पाटील यांच्याकडे काही कामानिमित्त गेले होते. काम आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या घरी परतत असताना गिरमे चौकाजवळ त्यांचा मोटारसायकलवरून पाठलाग करत ५ ते ६ इसमांनी आडवळण करून अडवले. अचानक हल्ला करत त्यांना रस्त्यावर ओढून फेकून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी “ए पारध्या, तुला समाजसेवेचा पुळका चढला का?” अशा अपमानास्पद जातिवाचक शब्दांत शिवीगाळ करत, त्यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावण्यात आली. हल्लेखोरांनी “अजून सुधारला नाहीस तर कायमचा काटा काढू” अशी धमकीही दिली आणि तेथून पळ काढला. या घटनेमुळे दीपक चव्हाण हे हादरून गेले. त्यांनी तत्काळ आपल्या मित्र मा. नगरसेवक रवी पाटील यांच्या शी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. रवि पाटील व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांनी स्वतः हजर राहून सविस्तर तक्रार दाखल केली असून, मारहाणीमुळे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्यांना साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पोलीसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा क्रमांक ७२७/२०२५ प्रमाणे कलम 115(2) कलम 126(2)कलम 119(1) कलम 189(2)कलम 190कलम 191(2) कलम 351(2) कलम 352 गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे , हल्लेखोर सध्या फरार आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. दीपक चव्हाण यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी हल्लेखोरांचे चेहरे स्पष्टपणे पाहिल्याचे नमूद केले असून, ते पुन्हा समोर आल्यास ओळखू शकतात, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर श्रीरामपूरमध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विविध संघटना, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेचा निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दीपक चव्हाण हे माजी नगरसेवक असून, समाजसेवेच्या क्षेत्रात त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी अनेक गरजू, वंचित आणि शेतकरी वर्गासाठी कार्य केले असून, त्यांच्या माध्यमातून अनेकांना आधार मिळाला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर झालेला नियोजित हल्ला आणि जातीवाचक अपमान ही समाजमनाला कलुषित करणारी घटना असल्याचे मत सामाजिक वर्तुळातून व्यक्त केले जात आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हा दाखल केला असला तरी, हल्लेखोर कधी अटकेत येतात आणि मुख्य सूत्रधार कोण आहे, याकडे संपूर्ण श्रीरामपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, दीपक चव्हाण यांची प्रकृती स्थिर असून, साखर कामगार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही ही घटना गंभीर मानली जात असून, यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय अथवा व्यक्तिगत वाद होते का, याचाही तपास पोलीस प्रशासन करत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
25.5 ° C
25.5 °
25.5 °
91 %
1.9kmh
100 %
Sat
26 °
Sun
32 °
Mon
32 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

error: Content is protected !!