Homeमोठी बातमीश्रीरामपूरमध्ये खळबळजनक प्रकार : अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर...

श्रीरामपूरमध्ये खळबळजनक प्रकार : अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देवून हॉटेलमध्ये नेल्याचा प्रकार उघड

श्रीरामपूरसह राज्यभर गाजलेले दीपक बर्डे खून प्रकरणातील आरोपीचा नातेवाईक

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा एक खळबळजनक घटना समोर आली असून, दीपक बर्डे खून प्रकरणात गाजलेल्या मुख्य आरोपीचा जवळचा नातेवाईक असलेल्या अमीर अजीज शेख याने एका अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देवून हॉटेलमध्ये नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली असून, पोलीस तपास अधिक गतीने सुरू आहे.

पीडित मुलीच्या आईने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ती आपल्या मुलांसह श्रीरामपूर शहरात राहते व खाजगी नोकरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिची मुलगी बारावीची परीक्षा देऊन सध्या घरीच आहे. दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता फिर्यादी आपल्या कामावर असताना दोन ओळखीच्या इसमांनी तिला माहिती दिली की तिची मुलगी श्रीरामपूरमधील एका नावाजलेल्या हॉटेलमध्ये एका मुलासोबत आहे. ही माहिती मिळताच पीडितेने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, तिची मुलगी अमीर अजीज शेख या युवकासोबत बसलेली आढळली. सदर युवक पूर्वीही पीडित मुलीसोबत मैत्री असल्याचा दावा करत तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार फिर्यादीने यापूर्वी दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली होती. मात्र त्या वेळी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्थी करत आरोपीला जामिन मंजूर करून देण्यात मदत केली होती.

या घटनेनंतर पीडितेने आपल्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, मुलीने सांगितले की अमीर अजीज शेख याने जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिला फसवून हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर पीडितेने मुलीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये अश्लील व लज्जास्पद फोटो आढळले. विशेष बाब म्हणजे पीडित मुलगी ही अनुसूचित जातीची असूनदेखील आरोपी अमीर अजीज शेख याने तिच्या जातीविषयी माहिती असूनही तिच्यासोबत असे लज्जास्पद वर्तन केल्याने, या प्रकरणात फौजदारी व पोस्को अधिनियमासोबतच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 396/2025 अन्वये भादंवि कलम 74, 137(2), 352, तसेच ‘पोस्को अ‍ॅक्ट’चे कलम 8, 12 आणि अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचे कलम 3(1)(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणामुळे श्रीरामपूर शहरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, आरोपीचा संबंध दीपक बर्डे खून प्रकरणाशी जोडला जात असल्यामुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. पोलिसांकडून आरोपीचा अधिक सखोल तपास सुरू असून, या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
25.9 ° C
25.9 °
25.9 °
84 %
2.9kmh
92 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
30 °
Thu
29 °

Most Popular

error: Content is protected !!