Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरच्या थत्ते मैदानावर पाळण्याच्या ठिकाणी गावठी कट्ट्यासह तरुण पकडला; चार जिवंत काडतुसे...

श्रीरामपूरच्या थत्ते मैदानावर पाळण्याच्या ठिकाणी गावठी कट्ट्यासह तरुण पकडला; चार जिवंत काडतुसे जप्त

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण असताना, काल मंगळवारी (दि. ८ एप्रिल) रात्री सुमारे ११.३० च्या सुमारास थत्ते मैदान येथील यात्रेच्या गर्दीमध्ये पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक करून चार जिवंत काडतुसे जप्त केल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मनोज संजय साबळे (वय २३, रा. साई मंदिर जवळ, डावखर रोड, श्रीरामपूर) या तरुणाविरुद्ध भारतीय हत्यार कायदा (Arms Act) कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, दादाभाई मगरे, तसेच पोलीस कर्मचारी अमोल पाडोळे, पंकज सानप, सागर बनसोडे आणि संजय बडे हे मंगळवारी रात्री यात्रेच्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना ‘मौत का कुआ’जवळील जॉगिंग ट्रॅक परिसरात एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली.

सदर माहितीच्या आधारे पंचांसह त्या तरुणास ताब्यात घेण्यात आले असता, त्याच्याकडे ‘मेड इन युएसए’ असे लिहिलेले गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा कट्टा आणि काडतुसे ताब्यात घेतली असून, गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८७/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव हे करत आहेत. या घटनेमुळे यात्रेच्या ठिकाणी आणि संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. गर्दीच्या ठिकाणी शस्त्रधारी तरुणाची उपस्थिती ही गंभीर सुरक्षात्मक त्रुटी मानली जात असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!