Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपुरात मोठी कारवाई: “आदर्श लॉज”वर अनैतिक देहव्यवसायाचा शिक्का, लॉज तब्बल एक वर्षासाठी...

श्रीरामपुरात मोठी कारवाई: “आदर्श लॉज”वर अनैतिक देहव्यवसायाचा शिक्का, लॉज तब्बल एक वर्षासाठी सीलबंद

श्रीरामपुर (प्रतिनिधी):- शहरातील रंगोली रोडवरील “आदर्श लॉज” येथे सुरू असलेल्या अनैतिक देहव्यवसायावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करत सदर लॉज एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. समाजातील असहाय व निराधार महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आदर्श लॉज येथे लॉजचा मॅनेजर धीरज प्रमोद बिंगले (वय ३५, रा. रंगोली रोड, वार्ड क्र. ५, श्रीरामपुर) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यानुसार अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी व श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करून बनावट ग्राहक व दोन पंचांसह लॉजवर सापळा रचण्यात आला. छाप्यात लॉजच्या काऊंटरवर मॅनेजर धीरज बिंगले हा आढळून आला. तसेच लॉजमधून तीन पीडित महिला मिळून आल्या. चौकशीत बिंगले व त्याचा साथीदार अहमद शेख (रा. बाबरपुरी, वार्ड क्र. २, श्रीरामपुर – फरार) हे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत ग्राहकांकडून पैसे उकळत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८२३/२०२५ नुसार स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ चे कलम ३, ४, ५ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या गुन्ह्यात आणखी चार आरोपी निष्पन्न झाले आहेत.

विशेष म्हणजे, यापूर्वीही दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी याच लॉजवर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळीही गु.र.नं. २०/२०२४ अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही लॉजच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नसून आरोपी पुन्हा पुन्हा महिलांना देहव्यवसायाकडे ढकलत असल्याचे निदर्शनास आले.धार्मिक स्थळांच्या परिसरात असुरक्षिततेचे वातावरणसदर आदर्श लॉज हे श्रीराम मंदिर, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, गणपती मंदिर व नुराणी मस्जिद यांसारख्या धार्मिक स्थळांच्या अत्यंत जवळ आहे.

तसेच परिसरात निवासी वस्ती, शाळा व महाविद्यालये असल्याने नागरिक, विद्यार्थी व भाविकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सामाजिक सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ चे कलम १८ अंतर्गत आदर्श लॉजचा परवाना रद्द करून लॉज बंद करण्याचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे सादर केला. त्यानंतर मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय दंडाधिकारी, श्रीरामपुर यांनी संबंधित लॉजविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र आरोपींनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी आदर्श लॉज एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले. आदेशानुसार सदर लॉजमधील कब्जेदारांना सात दिवसांत निष्कासित करून लॉज पोलीस प्रशासनाकडून सीलबंद करण्यात येत आहे. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, भविष्यात ज्या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे व लॉज/हॉटेल चालकांचा सहभाग निष्पन्न होईल, त्या ठिकाणीही अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मेढे, दादाभाई मगरे, पोशि आझीनाथ आंधळे, अंबादास आंधळे, सचिन दुकळे, अमोल पडोळे, अमोल गायकवाड, मच्छिंद्र कातखडे व मपोशि मिरा सरग यांनी केला

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
14.7 ° C
14.7 °
14.7 °
36 %
1.7kmh
0 %
Tue
14 °
Wed
31 °
Thu
30 °
Fri
30 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!