Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामनवमी यात्रोत्सवाला भरघोस प्रतिसाद; थत्ते मैदानावरील खेळण्या-पाळण्यांमुळे यात्रेला नवा उत्साह

श्रीरामनवमी यात्रोत्सवाला भरघोस प्रतिसाद; थत्ते मैदानावरील खेळण्या-पाळण्यांमुळे यात्रेला नवा उत्साह

श्रीरामपूर (प्रतिनिधी): गेल्या पन्नास वर्षांत कधीच न झालेले भव्य आयोजन यंदा श्रीरामनवमी यात्रोत्सवाच्या निमित्ताने थत्ते मैदानावर पाहायला मिळाले. राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात खेळण्या-पाळण्यांची मांडणी करून यात्रेला आकर्षणाचे नवे रूप देण्यात आले. यामुळे यात्रेला जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे. राजकोट येथून मागवण्यात आलेल्या आकर्षक खेळण्या-पाळण्यांमुळे वातावरण उत्सवी झाले असून, यात्रेला यंदा नवा जोम मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांत श्रीरामपूरची श्रीरामनवमी यात्रा लवजिहाद, महिलांची छेडछाड, भुरट्या चोऱ्या आणि परगावाहून आलेल्या व्यापाऱ्यांच्या लुटीमुळे चर्चेत आली होती. परिणामी, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली यात्रा पोलिस प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव रात्री दहा वाजेनंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यात भर म्हणून, काही सेक्युलर विचारसरणीचे स्थानिक पुढारी थत्ते मैदान जिहादी प्रवृत्तींना लिलावात देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे यात्रेच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचा गंभीर आरोप काही यात्रेकरूंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी यंदा “जिहादी मुक्त यात्रोत्सव” करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळेच त्यांनी थत्ते मैदानावरील खेळण्या-पाळण्यांचे टेंडर पूर्णपणे वेगळ्या मार्गाने घेऊन नवीन पायंडा पाडला आहे. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण वातावरण सुरळीत, सुरक्षित आणि भाविकांसाठी आकर्षक झाले आहे.

दरम्यान, यामध्ये किरकोळ वादविवाद किंवा अफवांच्या जोरावर यात्रा बदनाम करण्याचा डाव काही टोळ्यांकडून सुरू आहे. अशा प्रकारांना नागरिकांनी गांभीर्याने न घेता, सकारात्मक उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रीरामनवमी यात्रोत्सव म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि एकात्मतेचे प्रतीक असून, त्याला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, यासाठी प्रशासन आणि आयोजक प्रयत्नशील आहेत. यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद आणि भाविकांचा उसळलेला उत्साह हेच या आयोजनाचे यश दर्शवत आहेत.

RELATED ARTICLES
Jharkhand
moderate rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
88 %
0.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
32 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!