Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरमाजी उपनगराध्यक्ष विरोधात गंभीर गुन्हा दाखल,या मागे “राजकीय वास" - अंजुम शेख...

माजी उपनगराध्यक्ष विरोधात गंभीर गुन्हा दाखल,या मागे “राजकीय वास” – अंजुम शेख यांचा खुलासा!

श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. ज्यात माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांच्या सह 6 जणां विरोधात अपहरण, फसवणूक, जमीन हस्तांतराचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर आरोपांखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा 2023 पासून न्यायप्रविष्ट असलेल्या जमीन व्यवहार प्रकरणाशी संबंधित असून. माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता कलम 364 अ, 420, 406, 504, 506, 34 अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दाखल गुन्ह्या संदर्भात प्रतिक्रिया देताना माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांनी सदर जमीन आमच्या कंपनीने भविष्यातील व्यवहारासाठी केवळ करार केला आहे. कोणताही ताबा अथवा जमीन हस्तांतर करण्यात आली नाही. फिर्यादी दीपक डावखर यांच्याशी आजही आमचे चांगले संबंध आहेत, त्यांनी पुरेशी शहानिशा न करता गुन्हा दाखल केला. शेख यांनी पुढे संशय व्यक्त केला की, या गुन्ह्यामागे राजकीय वास आहे. काहीजण मुद्दामहून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे या घटनेने श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचे वारे उठले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. याविषयी अधिक माहितीसाठी येथे 👉क्लिक करा

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!