Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरभैरवनाथनगरच्या लोकनियुक्त सरपंच सौ.दिपालीताई फरगडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच २०२५ पुरस्कार प्रदान

भैरवनाथनगरच्या लोकनियुक्त सरपंच सौ.दिपालीताई फरगडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच २०२५ पुरस्कार प्रदान

श्रीरामपूर:– तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.दिपालीताई फरगडे यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच २०२५ पुरस्कार सिने अभिनेते श्री.मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते आणि सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बाबासाहेब पावसे, ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री.एकनाथराव ढाकणे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागात विकासाचा ध्यास घेऊन गावाचा विकास करण्यासाठी प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजनाच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातचं नव्हे तर जिल्ह्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.दिपालीताई फरगडे यांचाही त्यांनी केलेल्या कार्याची दाखल घेऊन स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने “ आदर्श सरपंच सन्मान २०२५” हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या पुरस्कार प्रदान प्रसंगी नवनाथ अकोलकर सर, भैरवनाथनगर ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लबडे, अलका वायकर, ज्योती लाहोरे, सिमा शिंदे , कांता शेळके, वैशाली फरगडे, सपना सोनार , मनिषा शिंदे, यासीन शेख, ज्योती लबडे, मनिषा चौधरी, छाया थोरात,सविता आढाव, कोमल फटांगरे, शारदा जाधव, खादी ग्रामोद्योगचे व्हा.चेअरमन प्रविण फरगडे, राजेंद्र फरगडे, विजय शिंदे, आरोग्य अधिकारी सुभाष शेळके, श्रीराम फरगडे, अविनाश लबडे , नितीन लबडे, उमेश लबडे, भागिनाथ गुंड आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!