Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरभाजपने श्रीरामपुरात दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानचा जाळला झेंडा

भाजपने श्रीरामपुरात दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानचा जाळला झेंडा

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत श्रीरामपुरात भाजपने माजी नगरसेवक रवी पाटील, माजी नगरसेवक दिपक चव्हाण, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी पुतळा येथे पाकिस्तानचा झेंडा जाळला. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.यावेळी बाजार समिती संचालक नाना शिंदे, विराज भोसले, बाबासाहेब शेटे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केतन खोरे म्हणाले की, पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा भारताच्या अस्मितेवर केलेला हल्ला असून धर्म विचारुन पर्यटकांना मारणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदूंना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास असून पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादाचा समूळ नाश करावा अशी मागणी केली.

रवी पाटील म्हणाले की, दहशतवाद्यांचा खात्मा करायचा ही वेळ असून २०१४ पासून मोदींमुळे जगभरात भारत देश हा शक्तिशाली बनला आहे हीच पाकिस्तानची पोटदुखी आहे. दहशतवाद्यांचा बंदोबस्त करुन भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेऊन आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन केले.

तर बोलताना दीपक चव्हाण म्हणाले की, भारत शांतताप्रिय देश आहे. हा दहशतवादी हल्ला आपल्या देशाच्या शांततेला भंग करण्यासाठी झाला असून पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसले आहे. मोदी सरकारने तात्काळ कारवाई करुन पाकिस्तानसह इस्लामिक दहशतवाद्यांना कंठस्नान द्यावे अशी मागणी केली.

यावेळी रविराज बेलदार, योगेश ओझा, प्रविण लिप्टे आदींची भाषणे झाली. यावेळी सूर्यकांत तांबडे, राजेंद्र ओहोळ, योगेश बनकर, किरण उईके, विशाल रुपनर, राजेंद्र चव्हाण, सागर म्हस्के, विशाल ठाणगे, चांगदेव देखणे, नवनाथ पवार, किरण सिंग टाक, चंदन सिंग जुनी, मच्छिंद्र धोत्रे, योगेश व्यवहारे, सागर जाधव, किरण पठारे, प्रकाश सडमाके, पृथ्वी चव्हाण, शिवम चव्हाण, तुषार परदेशी, अवधूत शिंदे, ऋषिकेश पाटील, कार्तिक मंडवे, राहुल राऊत, संकेत पाटील, पराग फोपळे, अमित कांबळे, भारत शिरसाठ, तेजस गायकवाड, योगेश मिश्रा, युवराज वाघ, सिद्धांत पाटील, उमेश बिडवे, विजय पाटील, कुणाल कुंभकर्ण, दर्शन पाटणी, शंतनू गोराणे, सचिन डोफे, शरद शिंदे, वाकचौरे सर, कुणाल दहिटे, संकेत नागरे, संदीप गुंजाळ, लखन गायकवाड आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
27.5 ° C
27.5 °
27.5 °
77 %
1.8kmh
98 %
Wed
27 °
Thu
33 °
Fri
27 °
Sat
31 °
Sun
32 °

Most Popular

error: Content is protected !!