Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरभाजपच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी चिडे तर शहराध्यक्ष पदी छाजेड

भाजपच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी चिडे तर शहराध्यक्ष पदी छाजेड

नूतन तालुकाध्यक्ष चिडे व शहराध्यक्ष छाजेड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा - माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे

श्रीरामपूर | प्रतिनिधी:– भारतीय जनता पक्षाने श्रीरामपूर तालुका व शहर संघटनेच्या नेतृत्वात नवे दम भरत, तालुकाध्यक्षपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब चिडे यांची, तर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे आगामी काळात पक्षाची वाढ व बळकटी होईल, असा विश्वास भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी व्यक्त केला.

दि. २० एप्रिल रोजी श्रीरामपूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या विशेष बैठकीत पक्ष निरीक्षक सुभाष वहाडणे व योगेश गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला.

या कार्यक्रमास माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे, माजी शहराध्यक्ष मारुती बिंगले, बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भाऊसाहेब बांद्रे, सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. शंकरराव मुठे, महेंद्र पटारे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कविता दुबे, तसेच पुष्पलता हरदास, पूजा चव्हाण, जयश्री थोरात, भैया भिसे, विशाल अंभोरे, संदीप आसने, मनोज भिसे, आसिफ पोपटिया, बंडू शिंदे, साजिद सय्यद, नारायण काळे, प्रफुल्ल डावरे, रवि पंडीत, अजित बाबेल, मनोज धामोणे, भैया भारत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडीमुळे पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होईल व आगामी काळात श्रीरामपूर तालुका व शहरात भाजपच्या कार्याला गती मिळेल, असे बोलले जात आहे. नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चौकट

तालुकाध्यक्ष पदाच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी काम करणार – चिडे

पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन दिनकर, तालुक्याचे नेते दीपक अण्णा पटारे यांनी आज जो विश्वास दाखविला आणि श्रीरामपूर तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली ही जबाबदारी निश्चितच पूर्ण विश्वासाने पार पाडणार असून सर्वांच्या विश्वासास पात्र राहून तालुकाध्यक्ष पदाच्या माध्यमातून तालुक्यात पक्ष वाढीचे काम करणार असल्याचे प्रतिपादन नूतन तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे यांनी व्यक्त केले.

चौकट

नूतन तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांनी पक्ष वाढीसाठी चांगले काम करावे - दीपक पटारे

भारतीय जनता पार्टीच्या श्रीरामपूर शहर व तालुका अध्यक्ष पदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली असून यामध्ये नवनियुक्त तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे व शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांनी भारतीय जनता पक्षाचे विचार तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष वाढीसाठी चांगले काम करावे असे मत माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी व्यक्त करत नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!