श्रीरामपूर (प्रतिनिधी) – जनकल्याण फाउंडेशन गोंडेगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण आणि कवीसंमेलनाचा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी येथील बालव्याख्याता साई उत्तम मोहन याने आपल्या प्रभावी आणि समर्पक भाषणाने उपस्थितांचे मन जिंकले. आठ मिनिटांच्या भाषणात साईने छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर सखोल विचार मांडत उपस्थितांवर प्रभाव टाकला. या कौतुकास्पद कामगिरीसाठी साई मोहन याचा सन्मान जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. उपप्रादेशिक अधिकारी राणी सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक राणी जाधव, माजी पोलीस अधिकारी क्राईम ब्रांचचे सुभाष सोनवणे, फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कर्डक, सुमनताई तिजोरे, ग्रामीण कवी आनंदा साळवे आणि गझलकार रज्जाक शेख यांच्या हस्ते साईला सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रामगीता व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. साईच्या या यशाबद्दल माळेवाडीचे सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटी, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी त्याचे विशेष कौतुक केले असून, परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. साई मोहन याने वयाच्या कमी वयातच समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेतल्याने तो अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे.
बालव्याख्याता साई मोहन यांचा जनकल्याण फाउंडेशनतर्फे गौरव; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त सन्मान
RELATED ARTICLES
Jharkhand
broken clouds
25.8
°
C
25.8
°
25.8
°
88 %
2.9kmh
54 %
Thu
26
°
Fri
32
°
Sat
31
°
Sun
31
°
Mon
31
°