Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरपढेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पढेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीरामपूर/प्रतिनिधी :– तालुक्यातील पढेगाव गावात राहणाऱ्या एका 14 वर्षे 8 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून जबरदस्ती व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित मुलीने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत आरोपी रोहीत शरद भाटे (रा. टिळकनगर, श्रीरामपूर) याच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत.

पीडित मुलगी आपल्या आईसोबत पढेगाव येथे राहते. तिचे वडील दहा वर्षांपासून कुटुंबापासून विभक्त असून तिची आई मजुरी करून उदरनिर्वाह करते. पीडिता सध्या पढेगाव येथील एका विद्यालयात इयत्ता 9 वीत शिक्षण घेत आहे व उन्हाळी सुट्टीमुळे घरीच होती.29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता तिची आई कामासाठी शेतावर गेल्यानंतर पीडिता घरी एकटी होती. दुपारी 1 वाजता शिक्षणासाठी गावात पूर्वी राहणारा आणि परिचयाचा असलेला रोहीत भाटे अचानक घरात घुसला. त्याने दरवाजाला कडी लावली व पीडितेला लग्नासाठी दबाव टाकत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडितेचा हात पकडून मिठी मारली, व अश्लील वर्तन केले. तसेच कपडे काढण्याचा प्रयत्न करत तिला धमकी दिली की कोणाला काही सांगितल्यास तिला ठार मारेल. पीडितेच्या आरडाओरडीनंतर शेजारी राहणारा विशाल प्रदीप तोरणे धावून आला. त्याने दरवाजा वाजवल्यावर पीडितेने आरोपीला धक्का देऊन दरवाजा उघडला. त्यानंतर विशालने दोघांनाही थांबवून ठेवले व पोलीसांना व पीडितेच्या आईला माहिती दिली. काही वेळातच पोलीस व आई घटनास्थळी पोहोचले व मुलीला सोबत घेऊन श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले.

या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर प्रमाणे 257/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 74, 75(2), 127(2), 351(2), 351(3), 352 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास परी सहाय्यक पोलिस अधीक्षक रॉबिन बन्सल हे करीत आहेत. या घटनेमुळे पढेगाव परिसरात संतापाची लाट पसरली असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
broken clouds
30.4 ° C
30.4 °
30.4 °
70 %
2.7kmh
65 %
Wed
30 °
Thu
31 °
Fri
29 °
Sat
27 °
Sun
31 °

Most Popular

error: Content is protected !!