Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरदारूच्या नशेत महिलेशी असभ्य वर्तन; संतप्त पतीकडून शिक्षकाला बेदम चोप

दारूच्या नशेत महिलेशी असभ्य वर्तन; संतप्त पतीकडून शिक्षकाला बेदम चोप

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शिक्षक ही समाजातील अत्यंत सन्माननीय आणि जबाबदारीची भूमिका असते. परंतु या नात्याला काळीमा फासणारी घटना गुरुवारी रात्री श्रीरामपूर शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात घडली. दारूच्या नशेत एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून, संबंधित महिलेच्या पतीने मद्यधुंद शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तपास सुरू आहे. गुरुवारी (दि. ३० मे) रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनी परिसरात दोन शिक्षक मद्यधुंद अवस्थेत आले. याचवेळी त्या परिसरात एक लहान मुलगा खेळत असताना एका कुत्र्याला घाबरून खाली पडला. हा प्रकार पाहून मद्यधुंद शिक्षकाने संतापाच्या भरात त्या कुत्र्यावर हात साफ करायला सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी दांडा घेऊन शिक्षकाने कुत्र्याला अमानुषपणे मारहाण केली. हा प्रकार पाहून अनेक नागरिक चक्रावले.

विशेष बाब म्हणजे, ज्या कुत्र्यामुळे मुलगा पडला तो त्या महिलेचा नव्हताच. तरीदेखील संबंधित शिक्षकाने रागाच्या भरात तिच्या घराकडे धाव घेतली आणि त्या महिलेशी धक्काबुक्की, आक्षेपार्ह बोलणे व दारात घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अचानक आलेल्या या हल्ल्याने महिला घाबरून गेली आणि तिने जोरात आरडाओरड सुरू केली. आरडाओरड ऐकून तिचा पती तातडीने घटनास्थळी आला. त्याने संपूर्ण प्रकार समजताच मद्यधुंद शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला. दरम्यान, शिक्षकासोबत असलेला दुसरा व्यक्ती देखील शिक्षकच असल्याचे समजते. तो मात्र गोंधळ उडाल्याचे लक्षात येताच घटनास्थळावरून पळून गेला. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाला तातडीने श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या जखमा साफ केल्या असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे आढळून आलेला व्हिडीओ देखील समोर आला आहे. संबंधित व्हिडीओमध्ये मद्यधुंद अवस्थेतील शिक्षक कुत्र्याला मारहाण करताना आणि नंतर महिलेकडे जाऊन असभ्य वर्तन करताना स्पष्ट दिसून येत आहे. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. महिलेशी गैरवर्तन, घरात बेकायदेशीर प्रवेश, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, प्राण्यांवर अमानुष अत्याचार करणे या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांखाली संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी महिलेचा जबाब घेतला असून अन्य साक्षीदारांचे निवेदन देखील नोंदवले जात आहे. या घटनेनंतर म्हाडा कॉलनी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. त्यांच्या कडून असे वर्तन अपेक्षित नसते. काही स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शिक्षकाचं काम आहे ज्ञान देणं, असं विकृत आणि हिंसक वर्तन समाजाला कलंकित करणारं आहे.” अनेकांनी सोशल मीडियावरून देखील या प्रकाराचा निषेध केला आहे.

या प्रकारामुळे शिक्षक संघटनांनीही या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित शिक्षकांविरोधात फौजदारी कारवाईसह शैक्षणिक कारवाईही व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने पाहून चौकशी सुरू करावी, अशी मागणी पुढे येत आहे. या घटनेच्या निमित्ताने महिलांवरील वाढत्या हिंसाचाराचा आणि मद्यपानामुळे वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मद्यधुंद अवस्थेत व्यक्ती आपले नैतिक भान गमावते आणि त्याचा थेट फटका निष्पाप नागरिकांवर, विशेषतः महिलांवर आणि मुलांवर बसतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की, “या घटनेतील सर्व पुरावे आम्ही संकलित केले असून, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, पीडित महिलेची तक्रार याच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.” शिक्षकासारख्या जबाबदार व्यक्तीकडून असे वर्तन केवळ अनुचितच नव्हे तर समाजमनाला हादरवणारे आहे. महिलांप्रती आदर आणि सार्वजनिक जबाबदारी याची जाणीव शिक्षकाला असायला हवी. या प्रकरणात कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर योग्य ती कारवाई व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाजाने सजग राहण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
25.1 ° C
25.1 °
25.1 °
88 %
1.5kmh
91 %
Tue
25 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!