Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिली आदर्श लोकशाही – शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिली आदर्श लोकशाही – शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांचे गौरवोद्गार

श्रीरामपुर : “जगातील सर्वात आदर्श आणि न्यायप्रधान लोकशाही भारतात आहे आणि ही लोकशाही आपल्याला लाभावी यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,” असे भावस्पर्शी उद्गार शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना बडदे म्हणाले की, “आपण सर्व भारतीय अत्यंत भाग्यवान आहोत कारण आपल्याकडे जगातील सर्वात पवित्र, समतेवर आधारित आणि लोकशाही मूल्यांनी नटलेली राज्यव्यवस्था आहे. ही देणगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या असीम बुद्धिमत्ता, तत्त्वनिष्ठा आणि त्याग यांचे फळ आहे.

“कार्यक्रमास अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक पटारे, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, महेंद्र त्रिभुवन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुभाष त्रिभुवन, वाहतूक सेनेचे यासीन सय्यद, शिवसेनेचे शहर सचिव राहुल रणधीर, विकास डेंगळे यांनी आपली उपस्थिती नोंदवली. शिवसेनेच्या महिला आघाडी आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये शिवअंगणवाडी जिल्हा प्रमुख शारदाताई कदम, निर्मला ताई शिंदे, ज्योती ताई सपकाळ, अनुराधा ताई आहेर, लता ताई गूढधे, उमेश आल्हाट, आशिष त्रिभुवन, राहुल रणपिसे, भैरव मोरे यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्व अधोरेखित केले. यावेळी संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे, सामाजिक समतेसाठी एकत्र येणे आणि बाबासाहेबांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप भारतमातेच्या जयघोषाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘जयभीम’ घोषणांनी गगनभेदी वातावरणात झाला. एकूणच, हा कार्यक्रम केवळ अभिवादनाचा नव्हे, तर सामाजिक ऐक्य, संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि समतेच्या लढ्याचा संदेश देणारा ठरला.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
25.9 ° C
25.9 °
25.9 °
84 %
2.9kmh
92 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
30 °
Thu
29 °

Most Popular

error: Content is protected !!