Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरगोंधवणी गावाचा अभिमान: डॉ. अथर्व रत्नाकर कोरडे यांचे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश

गोंधवणी गावाचा अभिमान: डॉ. अथर्व रत्नाकर कोरडे यांचे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश

श्रीरामपूर :– तालुक्यातील गोंधवणी गावाचा मान उंचावणारी आनंददायक बातमी समोर आली आहे. या गावातील प्रसिद्ध गुरु रत्नाकर कोरडे यांचे सुपुत्र, डॉ. अथर्व रत्नाकर कोरडे यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील अपूर्व यशाने गावाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. फक्त अभ्यासातच नव्हे तर कला, क्रीडा आणि योग थेरपी यामध्येही उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अथर्व यांनी आता वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.डॉ. अथर्व कोरडे हे अहिल्यानगर येथील AHMC कॉलेजचे होतकरू विद्यार्थी असून, त्यांनी MUHS University अंतर्गत घेण्यात आलेल्या तृतीय वर्षाच्या बीएचएमएस (BHMS) परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या उत्तम गुणांची आणि मेहनतीची ही दखल संपूर्ण श्रीरामपूर तालुका तसेच गोंधवणी गावात घेतली जात आहे. या यशामुळे संपूर्ण गावात आणि ब्राह्मण समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अथर्व यांच्या शिस्तप्रिय जीवनशैली, अभ्यासू वृत्ती आणि अथक मेहनतीमुळे हे यश शक्य झाले आहे, याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. त्यांच्या या अपूर्व यशामुळे गावातील तरुणाईमध्ये नव्या उमेद आणि प्रेरणेचा संचार झाला आहे. अथर्व कोरडे यांनी सिद्ध केले आहे की चिकाटी, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते.

डॉ. अथर्व कोरडे यांच्या या उल्लेखनीय यशाचे गावकरी, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष अभिनंदन होत आहे. भविष्यात ते वैद्यकीय क्षेत्रात आणखी मोठ्या उंचीवर पोहोचून समाजासाठी मोलाचे कार्य करतील, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त होत आहे. डॉ. अथर्व यांची ही प्रेरणादायी यशोगाथा नव्या पिढीसाठी आदर्श ठरत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण गावकऱ्यांकडून आणि शुभचिंतकांकडून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
87 %
1.5kmh
100 %
Tue
28 °
Wed
31 °
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!