Homeमहाराष्ट्रराहताचैत्र पौर्णिमा निमित्त वाकडीच्याखंडोबाचा दोन दिवस भव्य यात्रोत्सव

चैत्र पौर्णिमा निमित्त वाकडीच्याखंडोबाचा दोन दिवस भव्य यात्रोत्सव

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने आठवडे बाजार राहणार बंद.

राहता (प्रतिनिधि) अहमदनगर जिल्ह्याची प्रतिजेजुरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील खंडोबा मंदिरास विशेष अख्यायिका महत्व असलेल्या खंडोबा मंदिरात हनुमान जयंती निमित्त शनिवार दि 12 एप्रिल ते रविवार दि 13 एप्रिल रोजी दोन दिवस भव्य यात्रा उत्सव आयोजित केला असल्याची माहिती श्री खंडेराय देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात आली आहे.

यात्रेच्या आधल्या दिवशी नेहमीप्रमाणे खंडोबा मंदिर ते गावातील हनुमान मंदिर दरम्यान देवाची काठी मिरवनुक व देवाचा छबीना कार्यक्रम आयोजित केला आहे यात्रेच्या दिवशी पहाटे मल्हारी भक्तांनी आणलेल्या गंगेच्या पाण्याने देवाला स्नान घालून खंडेरायाची महापूजा आरती होऊन यात्रेस सुरुवात होणार आहे, वाकड़ी येथिल खंडेरायाच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांची दर्शनाची सोय व्हावी यासाठी देवस्थान ट्रस्ट कडून सुसज्ज दर्शन रांगेची सुविधा तसेच पिण्याचे पाणी,आरोग्य व्यवस्था,पार्किंग सुविधा आदीची व्यवस्था करण्यात आली आहे. वाकडी पंचक्रोशित खंडोबा महाराज यात्रेत होणाऱ्या गर्दी बाबत श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी दुपारी चार वाजता संपूर्ण गावातून खंडोबा महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक होणार आहे.यात्रेनिमित्त मंदिर परिसरात साफसफाई,पिण्याचे पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच विद्युत रोशनाई खंडेराय देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात येत आहे. वाकडी येथील खंडोबा मंदिर कळस, मंदिराचा गाभारा,भक्त निवास यासह महत्वाच्या ठिकाणी उत्कृष्ठ रंग काम देखील पूर्ण झाले असून मंदिर परिसरात वृक्षरोपण लागवड मधील वाढलेल्या झाडामुळे मंदिर परिसर निसर्गरम्य पर्यटन तीर्थ क्षेत्र बनला आहे.या यात्रेतील होणारी गर्दी पाहता खंडोबा मंदिर परिसरात व यात्रा परिसरात महत्वाच्या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. मंदिर परिसरात शुशोभीकरण व इतर तीर्थक्षेत्र विकास कामे सुरु आहेत.तरी वाकड़ी येथिल खंडोबा महाराज यात्रेचा पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन श्री खंडेराय देवस्थान ट्रस्ट,यात्रा कमिटी, वाकडी ग्रामपंचायत व वाकडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

वाकडी येथील खंडोबा देवाच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवार आहे. व वाकडी गावचा खंडोबा मंदिर परिसरात भरणारा आठवडे बाजार हा देखील रविवारी असल्यामुळे रविवार दि 13 एप्रिल रोजीचा आठवडे बाजार यात्रेमुळे बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती श्री खंडेराय देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात आली आहे.

राहता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा देवाच्या मंदिरास विशेष असे पौराणिक महत्व असून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत असलेल्या खंडोबा महाराजांचे राहता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा मंदिर असलेल्या ठिकाणी दोन दिवस वास्तव्य होते. आज या ठिकाणी लाखो भाविक खोबरे भंडारा उधळून नतमस्तक होतात त्यामुळे वाकडी येथील श्री खंडेराय देवस्थान ला वरिष्ठ दर्जात समाविष्ट करावे अशी मागणी श्री खंडेराय देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.1 ° C
29.1 °
29.1 °
73 %
2.4kmh
100 %
Sun
28 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!