Homeमहाराष्ट्रमहादेवजी जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त ५७ हजार रुपयांचा हार घालून भव्य सन्मान

महादेवजी जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त ५७ हजार रुपयांचा हार घालून भव्य सन्मान

पैठण/ प्रतिनिधी :– राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. महादेवजी जानकर यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी जानकर साहेबांना ५७ हजार रुपयांचा भव्य हार घालून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्षाचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ काटकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाशजी दिलवाले, शहराध्यक्ष सुरेश कटारे, जिल्हा संपर्कप्रमुख सतीश पल्हाळ, गंगापूर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वैद्य, कन्नडचे नवनिर्वाचित युवक आघाडी तालुकाध्यक्ष अनिल देठे, सिल्लोड तालुकाध्यक्ष भरत भोजने, सिल्लोड युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष आजिनाथ दांगोडे, गजानन नारळे, पैठण विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, पैठण युवक तालुकाध्यक्ष कृष्णा जाधव, तालुका कार्याध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस गणेश शिंदे, युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष भानुदास रिटे, आडगाव सरकचे सरपंच विकास रिटे तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वाचे आणि सामाजिक कार्याचे गौरवोद्गार काढले. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाने सामाजिक परिवर्तनासाठी उभे केलेले योगदान अधोरेखित करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम वातावरणात उत्साह, एकोप्याची भावना आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा दिसून आली.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
25.7 ° C
25.7 °
25.7 °
88 %
0.5kmh
100 %
Mon
26 °
Tue
27 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
32 °

Most Popular

error: Content is protected !!