Homeमहाराष्ट्रनेवासात्रिवेणेश्वर देवस्थान हंडी निमगाव येथे कामगारांसाठी सुरक्षा संच वितरण कॅम्प उत्साहात संपन्न

त्रिवेणेश्वर देवस्थान हंडी निमगाव येथे कामगारांसाठी सुरक्षा संच वितरण कॅम्प उत्साहात संपन्न

नेवासा (प्रतिनिधी) : त्रिवेणेश्वर देवस्थान, हंडी निमगाव येथे इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा संच वितरण कॅम्पाचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे कामगार मोर्चा नेवासा तालुकाध्यक्ष श्री. विवेक नन्नवरे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली हा कॅम्प यशस्वीपणे पार पडला.कामगारांना त्यांच्या हक्काचे सुरक्षा संच मिळावे व त्यासाठी त्यांचा एकही कामाचा दिवस वाया जाऊ नये या उद्देशाने तालुकाध्यक्ष विवेक नन्नवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन कार्यालयीन प्रक्रिया कामगारांच्या दारी आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कामगारांना कार्यालयांमध्ये हेलपाटे न मारता थेट त्यांच्या गावी सुरक्षा संच मिळवण्याची सोय झाली.

कार्यक्रमात विवेक नन्नवरे यांनी भविष्यात नेवासा तालुक्यातील एकाही कामगाराला सुरक्षा संच व भांडे संचापासून वंचित राहू दिले जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. भारतीय जनता पक्षाचा कामगार मोर्चा कामगारांच्या हक्कासाठी सदैव लढत राहील व त्यांच्या न्याय्य अधिकारांसाठी कटिबद्ध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कॅम्पचे आयोजन कामगार मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने केले. प्रमुख उपस्थितीत कामगार मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री. अमोल दिघे, उपाध्यक्ष श्री. सागर पुंड, तालुका सरचिटणीस श्री. प्रवीण मोरे तसेच नगरीतील अधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या. या उपक्रमामुळे नेवासा तालुक्यातील बांधकाम कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरला आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!