Homeमहाराष्ट्रअहिल्यानगरअवैध देशी दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल...

अवैध देशी दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अकोले तालुक्यातील कोतूळ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत लाखो रुपयांची अवैध देशी दारू जप्त केली आहे. निमगाव बागा-कोतूळ रस्त्यावर मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत, ६ लाख २ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ताब्यात घेतलेल्या दोघे आणि एका फरार आरोपीं विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक संदीप मांडवेकर यांनी दिली आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त सागर धोमकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे अधीक्षक प्रमोद सोनवणे,उपअधीक्षक प्रवीण कुमार तेली,राज्य उत्पादन शुल्क, श्रीरामपूर भरारी पथक क्रमांक २ चे निरीक्षक अनुपकुमार देशमाने यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक संदीप मांडवेकर,जवान यु. डी. काळे, ओ. बी. पालवे आदींनी यशस्वी पणे पार पाडली. याबाबत अधिक वृत्त पाहण्यासाठी येथे 👉क्लिक करा

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
25.1 ° C
25.1 °
25.1 °
46 %
2.2kmh
86 %
Fri
25 °
Sat
36 °
Sun
37 °
Mon
40 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!