Homeमहाराष्ट्रराहुरीअल्पवयीन मुलीसाठी लॉज उपलब्ध करून दिल्याप्रकरणी मालकास अटक; राहुरी पोलिसांची कारवाई

अल्पवयीन मुलीसाठी लॉज उपलब्ध करून दिल्याप्रकरणी मालकास अटक; राहुरी पोलिसांची कारवाई

परिसरातील हॉटेल चालकांत खळबळ

राहुरी (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये लॉज व हॉटेल चालकांची जबाबदारी गंभीर मानली जाते. केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर गुन्ह्यातील सहकारी म्हणून त्यांना गृहीत धरले जाईल. त्यामुळे कोणताही लॉज चालक ‘मला माहित नव्हते’ असे सांगून सुटू शकत नाही, असे वृत्त अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वीच प्रसारित करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यासाठी दोन वेगवेगळ्या लॉजचा वापर केल्याचे तपासात उघड झाले. यानंतर पोलिसांनी त्या दोन्ही लॉज चालकांनाही आरोपी केले. त्याअंतर्गत अनिकेत लॉजचा चालक व मालक अनिकेत जाधव (वय 27, रा. शिगवे नाईक) यास अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे .

सदर प्रकरणात जाधव याने आरोपीसोबत आलेल्या अल्पवयीन पीडित मुलीस कोणतेही वयाचे कागदपत्र न तपासता रूम उपलब्ध करून दिली होती. हे गंभीर दुर्लक्ष ठरल्याने राहुरी पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 917/25 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 64(1) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) कलम 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपासादरम्यान कलम 55 BNS व कलम 17 पोस्को ही वाढवण्यात आले.

दरम्यान, राहुरी पोलिसांनी हद्दीतील सर्व हॉटेल व लॉज चालकांना कठोर सूचना दिल्या आहेत. कोणताही ग्राहक आल्यास त्याचे ओळखपत्र व जन्मपुरावा तपासणे आणि त्याची नोंद रजिस्टरमध्ये करणे बंधनकारक असेल. अल्पवयीन मुलीसोबत आलेल्या कोणत्याही ग्राहकास रूम दिल्यास आणि त्यातून गंभीर गुन्हा घडल्यास, संबंधित मालकावर थेट कारवाई होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, हवालदार सतीश आवारे, पोहवा विश्वास बेरड, पोना अशोक कुदळे व रवी पवार यांनी केला आहे. राहुरी पोलिसांच्या या हालचालीमुळे परिसरातील हॉटेल व लॉज चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!